मोलाचे वाटतात मला
तुझ्या सोबतचे क्षण
पण ते निघून जातात
पुन्हा बेचैन होते मन
निघता पाउल निघत नाही
पण जाने भाग आहे
यापुढील प्रवासात
आठवणींची साथ आहे
मनातील आठवणी
लाटांसारख्या उसळतात
जशा काही नभातल्या
विजाच जणू कोसळतात
आयुष्यातील सारे दुःख
या डोळ्यांसमोर फिके आहे
कारण आता नजरेसमोर
तुझ्या आठवणीचेच धुके आहे
स्वतःचं मन मारून
तुला बरं जगता आलं
आपल्यांशी देखील तुला
परक्यासारखं वागता आलं
हात हजार मिळतात
अश्रू पुसण्यासाठी
डोळे दोनही मिळत नाहीत
सोबत रडण्यासाठी
मी मनसोक्त रडून घेते
घरात कुणी नसल्यावर
मग सहज हसायला जमतं
चारचौघात बसल्यावर
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा