पाऊलांची चाहूल
तुझेच भास
शेवटचा वाटेवर
अडकतात श्वास
तुझ्या नुसत्या भासाने,
श्वास सुसाट धावतात माझे.
मनी फक्त आस तुझी,
जवळ आठवणींचे ओझे.
माझ्याहून अधिक माझा
तुझ्यावर विश्वास होता
मला काय ठाऊक तो
उधार घेतलेला श्वास होता
रोज फूल तोडत होतो
मी तुझ्या केसांसाठी
पण तू सुगंधही नाही ठेवलास
माझ्या सरत्या श्वासांसाठी
तू भेटलीस त्या वाटेवर
सगळीकडे प्रेमच होतं
कुणास ठाऊक तुझं माझ्यावर
कुठल्या जन्माचं ऋण होतं
तुझं चोरून पाहणं
जेव्हा मला माहीत झालं
तेव्हापासून मला पाहणं
तू का गं रहित केलं ?
तुझं खरं-खोटं
खरचं आता लक्षात आलं
तात्पर्य एवढंच की
सारं खोटं माझ्या पक्षात आलं
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा