माझं मला काळतं
कसं मी राहायचं
तूच तुझं ठरव मला
कोणत्या दृष्टीने पाहयचं
माझ्या मनाचा मला
आरसा करता आला असता
तर तुलाही तुझा चेहरा
त्यात पाहता आला असता
सारं विश्व बदलताना
मी डोळ्यांनी पहिलं
पण या जगासोबत मला
बदलायचं राहिलं
खरोखरच काटे
एवढे कठोर नसतात
त्याशिवाय का फुलं
त्यावर फुलून हसतात
आपापल्या परीने
प्रत्येक जण सोसत असतो
मी खूप सोसलं असं
समोरच्याला भासवत असतो
मोर थुईथुई नाचतो
त्याची पिसे सांगतात
माणसं इतकी हुशार की
त्याचाही बाजार मांडतात
सुसाट सुटलेलं वादळ
कुठेतरी शांत होतं
उन्मळून पडलेल्या झाडासोबत
शेवटी तेही निवांत होतं
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा