एसटी दिसली;धावत आला

एसटी दिसली;धावत आला
सुबक-ठेंगणी शोधुन बसला 

एसटी सुटली,धक्का बसला
'सॉरी' म्हणुनी निकट सरकला
 त्या स्पर्षाने गंधित झाला
 'सरका तिकडे' वदली बाला

नेत्री गॉगल,गाल गुलाबी
नाजुक जिवणी ओठ सराबी
'सुटे पाचशे?' विनवी बाला
'इट्स माय प्लेझर' तोही वदला
   
'थँक्यू' म्हणुनी हसली गाली
टाटा करुनी निघून गेली
तिकीट द्यायला वाहक आला
'नोट खोटी' आणि तो म्हणाला

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा