बायको उठली;बरणी फुटली
नवरा म्हणतो,'बावळट कुठली
गरज वाटता मीच उठावे
सगळी कामे करत सुटावे
तुम्ही मात्र झोपून राहावे
आत्ताच कशी मग झोप तुटली ?
चहा आल्याचा नि गरम पोहे
शिरा केशरी तयार आहे
खाऊन खाऊन ढेरी सुटली
माझी मात्र भूकच तुटली
माहेरला जाउद्या मला
कळेल सगळे मग तुम्हाला
नको गं राणी ,गंमत केली
हिंमत माझी इतकी कुटली ?
very nice
उत्तर द्याहटवा