तुजवीण सख्या रे.......!

पावसाची गुज,
पाखरांची कुजबुज,
का ऐकू येत नाही,
सावलीची अलगुज......

रिता आहे वारा,
गंध वेडा तो नाही,
सुर तेच तरीही,
रस रंगला नाही....

आस तुझी,
ध्यास तुझा,
भेटशील ना रे...
स्वप्न राहील अपुरे....

तुजवीण सख्या रे...
तुजवीण सख्या रे...
तुजवीण सख्या रे...

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा