नाती ही अशीच असतात.....

कधी रुसतात कधी हसतात
तरी सर्वांच्या मनी वसतात
नाती ही अशीच असतात...

कुठे जुळतात कुठे दुरावतात
ईथे मिळतात तिथे हरवतात
नाती ही अशीच असतात...

काही फ़ुलतात काही कोमेजतात
आठवणी देतात विसरुन जातात
नाती ही अशीच असतात...

वर्षानू वर्षाची अनोळखी वाटतात
काही क्षणात आपलीसी होतात
नाती ही अशीच असतात...

5 comments