शांती

शस्त्र हाती घेउनीया
फिरतो शांतीचा दूत
मोक्षाचा सल्ला देत
स्मशानी फिरते भूत

जगात पाहीजे शांतता
असा आहे माझा धाक
मान जर का केली वर
जाळून मी करीन खाक

शब्दांचे स्वातंत्र्य आहे
पण तो शब्द माझा हवा
अभीव्यक्ती स्वातंत्र्याचा
हाच आहे अर्थ नवा

काळानुसार बदलते
स्वातंत्र्याची परीभाषा
प्रेतांनाही वाचा फुटेल
हिच एक आहे आशा

2 comments