शब्दांत नाही सांगता येणार
डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?
अस्वस्थ होइन मी जेव्हा
धीर मला देशील ना ?
माझ्याही नकळत दुखावले तुला तर
माफ़ मला करशील ना ?
ओघळले अश्रु माझे तर
अलगद टिपून घेशील ना ?
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?
चुकतोय मी असे वाटले कधी तर
हक्काने मला सांगशील ना ?
हरवलो मी कुठे कधी जर
सावरून मला घेशील ना ?
कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?
मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना ?
जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?
मला तुझी गरज आहे, हे
न सांगता ओळखशील ना ?
आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?
तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी..........
तूच एक असशील ना ?
khup khup chan kavita ahe, mala khup aavdali. thanks
उत्तर द्याहटवाbest kavita aahe.... so nice yar. jar tujakade aasha kavita aahet tar mala ya mail id var send kar na.. my mail id - subhash_820@rediffmail.com.
उत्तर द्याहटवा