चमकणाऱ्या काजव्यांना
रात्रीचा अंधार घालवता येत नाही
आणि त्या रात्रीला देखील
काजव्यांचा प्रकाश लपविता येत नाही
रातराणीचं आयुष्य म्हणतात
एका रात्रीचं असतं
एका रात्रीचं असल तरी
मोठ्या खात्रीचं असतं
इथे प्रत्येकाला वाटते
आपण किती शहाणे
यावर उपाय एकच
सर्व शांतपणे पाहणे
इथे प्रत्येकाला
प्रत्येकाचा भूतकाळ आहे
मला जगानं खूप छळलं
हा प्रत्येकाचा आळ आहे
जमिनच हरवली तर
मुळांनी कुंज्यायाच ?
ज्यांचा जीवावर फुलायचं
ते पाणी कोठून आणायचं
जमिनीतले पाणी मिळते
मूळ तेव्हा रुजते
निष्पर्ण झाडावर प्रेम बसरते
तेव्हा त्यालाही पालवी फुटते
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा