एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,
तिला पाहताच त्याला तीच वेड लागल
वेलीला विचारू तरी कस?
या प्रश्नाने त्याला पछाडल,
पण,
आपण जरा धीर धरावा अस
म्हणत त्याने स्वत:ला सावरल,
वेल मात्र आपली हसत ,खेळत राहत होती,
ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती ,
काही दिवसाने वेल मात्र जमिनीवर
पसरू लागली ,
ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली ,
वेल म्हणाली ,
झाडा मला तुझा आधार हवा आहे ,
तू मला आधार देशील का ??
यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का ???
ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली ,
ते पाहून झाडाची निराशा झाली ,
हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले ,
विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले,
वचन देताच वेळ मात्र झाडाला बिलगली ,
अन , हसता हसता त्याची आसवे हळूच ओघळली ,
आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला ,
कारन .... तिला आधार देण हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला.....
very nice
उत्तर द्याहटवा