चंद्रास सोभते चांदणी
हिर्यास सोभे हिरकणी
तुझी आठवण येते क्षणोक्षणी
म्हणून हातात घेतली लेखणी
जीवनाचे अर्घ्य तुला
तेव्हाच मी दिले होते
हातामध्ये हात जेव्हा
तुझे मी घेतले होते
तु नाही म्हणालीस तेव्हा
विखरून गेले प्रीतीचे शिंपले
पण तरीही अश्रूचे
का कुणास ठाऊक मोती झाले
तुला चोरुन पाहणं
माझं रोजचं झालं होतं
आज तुला दुसऱ्यासोबत पाहून समजलं
की आपलं घोडं इथंच पाणी प्यायलं होतं
हल्ली मी विचार करतो
खरंच प्रेम म्हणजे काय असतं
आजकालचं प्रेम म्हणजे
फक्त अडीच शब्दांचा खेळ असतं
मला तुझं हसन हवं आहे
मला तुझं रुसणं हवं आहे
तु जवळ नसतानाही
मला तुझं असणं हवं आहे
लोपला तुझं स्पर्श अन्
विरला तो लाडीक इशारा
सोबतीला धगधगता
फक्त्त तुझ्या प्रीतीचा निखारा
तुझे होकारार्थी संकेत
सारे फसवे निघाले
मी फुल पाहत गेलो
काटे कावेबाज निघाले
चेहरा कितीही लपवला तरी
डोळे लपवता येत नाहीत
प्रेम कितीही लपवलं तरी
डोळे ते लपवत नाही
प्रेम करा डोळसपणे
त्यात नको घ्याई
फसवणुक झाली तर
त्याला ग्राहक मंच नाही
tumcha blog khup chaan shabdaanche milan aahe..
उत्तर द्याहटवाछान ब्लाग,आवडला.
उत्तर द्याहटवा