नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
आणि मिठीत विसावताना
तुला जगाचं भान नसावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
बरसणाऱ्या पाऊसधाराना
दोघांच्या ओंजळीत टिपावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
हातात हात गुंफून
चार पावलं सोबत चालावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
माझ्या प्रीतीचं प्रतिबिंब
तुझ्या डोळ्यात उमटावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू नेहमी हसावं अन
हसताना मी तुला बघावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या विखुरलेल्या बटांना
मी अलगद सावरावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
चिमुकल्या डोळ्यातील
तुझं आभाळ स्वप्न बघावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
दुध पाण्यासारखं हे
आपलं प्रेम एकजीव व्हावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू माझ्या अन मी तुझ्या
स्वप्नांना बळ द्यावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या संगतीनं मग
आपल्या प्रेमाचं पिक बहरावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
विस्कटलेल हे घर नी
मन माझं तू सावरावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या ओठावरले ते ' अमृतकण '
माझ्या ओठांनी अलगद टिपावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
सहवासाने तुझ्या मग
माझ्यात बारा हत्तीचं बळ यावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू माळलेल्या मोग-याने
मग बेधुंद दरवळाव..
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुटलेल्या स्वप्नांना पुन्हा
तुझ्या डोळ्यात सजवावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
चुकलेल्या हुकलेल्या क्षणांना
पुन्हा एकवार जगावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
भारलेल्या या क्षणांना
मी निरंतर जपावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझं माझं गुपित तू
नजरेनं उलगडावं.
नेहमीच मला वाटतं
तू माझ्या जवळ असावं
माझ्या प्रत्येक सुखाशी
तुझं नातं असावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
घड्याळाच्या काट्याने मग
त्याच क्षणावर थांबावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या जवळ असण्यानं
माझ्या प्रयत्नाना बळ यावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
सोबतीने तुझ्या सखे
प्रेमाचं हे गौरीशंकर गाठावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
दिव्यांच्या प्रकाशात
तुझं तेजोमय रूप बघावं
luv u 2
उत्तर द्याहटवाsuperb aahe kavita..
उत्तर द्याहटवाkuphch sunder ahe he kavita. everyone want this kind of feeling
उत्तर द्याहटवाफारच सुंदर खूप खूप आवडली !
उत्तर द्याहटवा