थांबलेला रस्ता..
जरा भरून आलाय मन..
डोळ्यात एक हळवा ढग
जरा अलगद दाटतोय ..
तो पाउस सुद्धा आज जरा
दुखावलेला वाटतोय..
बहुतेक.. तो दूर गेलाय...
रोजचीच वाट..
आज का अनोळखी?
रोज दोन गाणी संपताच
घर यायचे समोर..
आज पाच गाणी झाली..
घर का दूर एवढे?
बहुतेक..तो दूर गेलाय...
काम जरा जास्त..
रोजच्या सारखी घाई नाही..
दिवस भर व्यस्त
संध्याकाळी पार्टी होती..
तरी मनाच्या जगात..
आज का मी एकटी?
बहुतेक...तो दूर गेलाय....
थांबवले खूप..
थांबला फक्त तो काळ
स्वप्नच होते सुंदर जणू...
आज ती अलवारशी
मिठी नाही मिळाली मागून...
बहुतेक....तो दूर गेलाय...
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा