फक्त तू

तू
तू अक्षर
तू अक्षरांचा शब्द
तू अनेक शब्दांची ओळ
तू तिन ओळींची त्रिवेणी
तू चार ओळींची मस्त चारोळी
तू वृत्त अलंकारांनी नटलेली कविता
तू आहेस एक अभिजात महाकाव्य....
....फक्त तू....
तू सामावतेस तुझ्यात सारी ब्रह्मांडे,,,।
तू आहेस या विश्वाची वसुंधरा
तू पावन भारतभूची संपदा
तू गंगा यमुना गोदावरी
तू शिवरायांची धरा
तू अंगण माझे
तू अणु
तू....

3 comments