तू मुलगी आहेस म्हणून का
तुला जन्मायचा हक्क आम्ही नाकारायचा?
तुझ्या येण्याने ह्या जगात
होणार्या आनंदाला आम्ही मुकायचं?
अगं.... आजची तू माझी कन्या
माझ्या उद्याच्या नातवांची आई
काय सांगावं कदाचित उद्याच्या
सुपर हीरोज ची असशील तू आई
राम,कृष्ण, पैगम्बर अन येशु
शिवाजी, गांधीजी की असो इंदिराजी
सगळ्या सगळ्याना एक आई होतीच की
नसतं तिला जन्मू दिलं आम्ही ....
तर इतिहास घडायची शक्यताच नव्हती...
इतिहास आम्हालाही घडवायाचा आहे
आणि घडवायाला तो इतिहास
एक माय प्रसवाविच लागणार आहे....
उद्याच्या स्रुजनाकरिता की...
उद्याच्या जगाला जगवायालाही ....
आम्हाला माय ही लागणारच आहे
म्हणून ...आणि म्हणुनच....
तू मुलगी आहेस म्हणून
तुला जन्मायचा हक्क आम्ही नाकारणार नाही
ह्या जगाला जगवण्या साठी
मायेची पखरण करण्या साठी
नव निर्मितीच्या सृजना साठी
तू ये... तू ये .. तू ये..
बालिका तू आजची
माता अनंत कालाची ....
तुला जन्मायचा हक्क आम्ही नाकारायचा?
तुझ्या येण्याने ह्या जगात
होणार्या आनंदाला आम्ही मुकायचं?
अगं.... आजची तू माझी कन्या
माझ्या उद्याच्या नातवांची आई
काय सांगावं कदाचित उद्याच्या
सुपर हीरोज ची असशील तू आई
राम,कृष्ण, पैगम्बर अन येशु
शिवाजी, गांधीजी की असो इंदिराजी
सगळ्या सगळ्याना एक आई होतीच की
नसतं तिला जन्मू दिलं आम्ही ....
तर इतिहास घडायची शक्यताच नव्हती...
इतिहास आम्हालाही घडवायाचा आहे
आणि घडवायाला तो इतिहास
एक माय प्रसवाविच लागणार आहे....
उद्याच्या स्रुजनाकरिता की...
उद्याच्या जगाला जगवायालाही ....
आम्हाला माय ही लागणारच आहे
म्हणून ...आणि म्हणुनच....
तू मुलगी आहेस म्हणून
तुला जन्मायचा हक्क आम्ही नाकारणार नाही
ह्या जगाला जगवण्या साठी
मायेची पखरण करण्या साठी
नव निर्मितीच्या सृजना साठी
तू ये... तू ये .. तू ये..
बालिका तू आजची
माता अनंत कालाची ....
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा