आय लव्ह यु

फोन आला त्याचा
मिटींगमध्ये आहे
उशीर होईल आज
गड्बडीत का होईना
म्हणाला
आय लव्ह यु
पुन्हा फोन आला
आवाज नशीलाच होता
बाजुला खिदळान्य़ाचा आवाज आला
बोलला काय बोलला
ऐकुच आले नाही बहुतेक
शेजारी कानात सांगत होता
आय लव्ह यु

पुन्हा पुन्हा तेच भास
पुन्हा तोच आवाज प्रेत्येक वेळेस
परकेपणा वाढत होता
परकेपणात ही
आपलेपणा दाखवायला
ढोंगी म्हणत होता मला
आय लव्ह यु

कल्पी जोशी

4 comments