आभासातला तू.....!!

आभासातला तू.....!!
आभासातला प्रिया तुझा भास,
मला किती सुखावून जातो,
तुझ्या माझ्यातल्या अंतराला,
माझ्या नकळत मिटवून जातो.

बंध हे आपुले जन्मोजन्मीचे,
तरीही दुरावा हा छळून जातो,
तुझ्या एका हाकेने परि मन हे,
आनंदच्या पावसात भिजून जाते.

डोळ्यांना आता या माझ्या,
एक तुझाच ध्यास रे असतो,
अन् नावाने तुझ्या माझे,
काळीजही बघ ठोका चुकते.

मन हे माझ वेड पाखरू,
तुझ्या आठवणींत रमून जात,
तुला अन् तुलाच वेड्यागत,
दैवाकडे माझ्या मागत राहत.


नको असा दूर जाऊस,
स्वप्नांना पायदळी तुडवून,
काळजाचे माझ्या तू,
असे तुकडे तुकडे करून.

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा