काय सांगु यार हो
असा सजुन येतो मोगरा
बहरतो माझ्या मनी
अन् त्रास देतो मोगरा
तेंव्हाची साथ आहे
जेंव्हा हाती माळला मोगरा
मादक मंद सुरेखीत
कमनिय आहे मोगरा
याच मोगरयाने केले होते
सुगंधी वार माझ्यावरी
आज त्याच जखमांवरी
न्यौछावर झालाय मोगरा
आहे माझ्यासवे आज
मैफ़लीला मोगरा
बरसुन गेल्यावरी ही
असुसलेला मोगरा
ओलेत्या मनी,
मोगरयाचा सुगंध गंधाळला,
अन् स्मृतीत आठवांच्या,
मी हरवलेला
एकला.....
असा सजुन येतो मोगरा
बहरतो माझ्या मनी
अन् त्रास देतो मोगरा
तेंव्हाची साथ आहे
जेंव्हा हाती माळला मोगरा
मादक मंद सुरेखीत
कमनिय आहे मोगरा
याच मोगरयाने केले होते
सुगंधी वार माझ्यावरी
आज त्याच जखमांवरी
न्यौछावर झालाय मोगरा
आहे माझ्यासवे आज
मैफ़लीला मोगरा
बरसुन गेल्यावरी ही
असुसलेला मोगरा
ओलेत्या मनी,
मोगरयाचा सुगंध गंधाळला,
अन् स्मृतीत आठवांच्या,
मी हरवलेला
एकला.....
सही !!!
उत्तर द्याहटवाउघडले हे काव्य
अन दरवळला मोगरा
वाचत मी गेलो
अन आवडला मोगरा
(शेवटच्या चार ओळीत मोगरा का बरे नाही?)