समई आणि .. मी



जळणारी वात अशीच रात्रभर जळत राहिली ..
तेल संपणार नव्हतचं ..
अगदी काठोकाठ भरलेल्या मोठ्या समईतुन ..
हेलकावणारी आकृती ..
समोर ठेवलेल्या फोटोवर ..
एक मंद काजळी पसरवत ..
आणि प्रत्येक हेलकाव्यातुन ..
ओकल्याप्रमाणे बाहेर सुसाट निघणारी ..
पुन्हा एक काजळाची धार टाकत ..
ति अशीच जळत राहिली ..

समईला तिच स्वतःच अस्तित्व नसतचं ..
फक्त ठेऊ तिथे तेवत रहायच ..
कधी कोठ्यावर, कधी देव्हाऱ्यात ..
तर कधी असचं कुठेतरी ..
आठवणींची काजळी ओकत ..
कुठल्याश्या फोटोपुढे कुणाच्या तरी आठवणींना उजाळा देत ..


तु होतीस तेव्हां रोज पेटायचा दिवा त्या समईतला ..
अगदी न चुकता !!
अताशा तुझ्याच फोटोपुढे,
काजळी पसरवतो ..
वात बदलायला वेळ असा नसतोच कधी ..
गोंगाट भरलेल्या डोक्याने आणि शांतता पसरलेल्या घरात ..
तिच जुनी वात रोज पुढे सरकत रहाते ..

घरात रात्रभर तेवणारी,
फक्त ती समई आणि .. मी

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा