" मोगरा "


गंध गेला हा सांगुनी ,आला मोहक मोगरा
बघ कसा रे मनात , दरवळतो मोगरा

रानीवनी पानोपानी , खुलुनी दिसे साजरा
हिरव्या रानी मुग्ध कळी , बहरतो हा मोगरा

शुभ्रफुलांचा ताटवा , करी किती रे नखरा
नवथर यौवनास , खुलुनी दिसे साजरा

कामिनिंच्या नजरेत , भाव उमटे लाजरा
मोकल्या कृष्णकुंतली , रिमझिमतो मोगरा

अबोल झाले अधर , गंधित झाल्या नजरा
प्रितीचे गोड गुपित , जणु सांगतो मोगरा


मंद मंद सुगंधाने ,भरून गेला गाभारा
श्वासातुनी अजुनही , घमघमतो मोगरा !

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा