आठवतात तुला ती ..
झुल्यावरची गाणी..
आपल्या आवडत्या नदीचं..
झुळझुळतं पाणी ..
तो गार शांत वारा..
आणि त्यावर चांदण्याचा पहारा..
नदीतलं चंद्राच प्रतिबिंब ..
आणि त्यात आपण दोघे चिंब..
श्रावणात पावसाच्या ढगांच
सूर्यावर पांघरूण..
अन पाउस सुरु झाल्यावर
आडोशाला उभारायचो सावरून..
पाउस थांबल्यानंतर
उन्हानं सजलेला इंद्रधनुष्य ..
आणि त्यातल्या रंगांनी ..
आपण सजवलेलं भविष्य ..
हिवाळ्यात मंद झुळकेने हि
अंगावर आलेला काटा..
हातात वाफाळता चहा
अन तुझ्या घराजवळचा फाटा...
वा-याच्या हेल्काव्यांनी ..
सुरु झालेली पानझड..
पडणारी पान वेचण्यासाठी..
आपल्या दोघांची धडपड..
ऊन चटके देऊ लागलं कि..
आपला नदीत डुंबणं..
अतिरेक झाला कि..
घरातल्यांचे खोलीत डांबणं..
मला हे सगळं आठवतं ..
तूलाही हे आठवेल?
तुला काय वाटते?
पुन्हा मागे जाणं आपल्याला जमेल?
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा