मोगराच तो ....


मोगराच तो ....
त्याचा गंध दरवळणारच...
दरवळणारा गंध धुंदही करणारच ....
काय सुगंधी होते ते दिवस
त्या मोगरयाने नटलेली सुगंधी मी
अन् त्या सुगंधाने धुंद तू

रोज कामावरून येतांना
आठवणीने आणायाचास माझ्यासाठी गजरा
मला गंधीत करून स्वत धुंद व्ह्यायसाठी

मग उगवल्या त्या काळ रात्री ...
ते कठीण दिवस ..तो त्रास... ती परवड
दोन जीवांची जाताना मी...
परत आले एकटी ...
एकटीच तनाने अन् मनाने खचलेली ...
तू वरवर गंभीर ..पण आतून पार हललेला

माझ्या त्या पार हरवलेल्या रुपाला बघून
अस्वस्थपणे वावरणारा ...
त्या कठिण दिवसात मला संभालून घेत
माझ्या लाम्ब सड़क वेणिचा झालेली
उंदराची शेपटी बघून उसासे सोडणारा ....


त्या दिवशी अचानक तू गजरा घेउन आलास....
आणि लक्षात आल्या बरोबर
त्या गजरयाला खिशातच चुरगळुन टाकलास ...
पण मोगराच तो ..
बेईमान झालाच
गंध तोच ...
पण धुंदी उतरवून गेला

आजकाल तू गजरा आणत ही नाहीस
मी सुगंधी होत ही नाही ...
आणी तू पण धुंद होत नाही
धुंद होत नाहीस.....

1 comments