मैत्री........तुझी - माझी

ओल्या पावसालाही चिंब करेल
अशी असावी मैत्री......
ओला पाऊसच काय
थेंब थेंब ही चिंब होईल
अशी मैत्री.......तुझी - माझी

अतुलनीय तो पाऊस-वारा
नाते असे हे तुझे - माझे
देव बांधितो ती नाती
नाही कुठल्या बंधनाने तूटे
अटूट नाते हे तुझे - माझे

दिवस साजरा करू "फ्रेंडशिप डे"
साजरे करूनी आपले नाते
साजरी करूनी आपली मैत्री
अविस्मरणीय बनवूनी तो दिवस
जगू आयुष्यातील प्रत्येक दिवस "फ्रेंडशिप डे"

नसे हा दिवस फक्त साजरा करण्यासाठी
नसे हे नाते फक्त दाखवण्यासाठी
आहे हे नाते तुझे - माझे
कधी न टूटणारे "अटूट नाते"
अशी असावी मैत्री
मैत्री तुझी - माझी..........

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा