मागच्या श्रावणाची रीतच काही और होती...

आज पहिलाच पाउसधो धो बरसून गेला,
मला मात्र तसाच कोरडा सोडून गेला।
मागच्या श्रावणाची रीतचकाही और होती,
तुझा हात हातात असतानाकुठल्या विजेची भीती होती...
चिंब चिंब भिजलेल अंगअन मन झाल गुंग,
मग कुठ राहीलगडगडणार्या ढगाच भान,
कारण सर्व होत छान छान....
गालातल्या खालित खुलेला तो हर्ष॥
ओठांचा ओठाना होणारा स्पर्श॥
खरच मागच्या श्रावणाची रीतच काही और होती...
आज तुझ्याशिवाय झेळलेल्याप्रतेक थेंबाची किम्मत अगदी शुन्य होती...!

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा