कस सांगू तुला मनात माझ्या काय ?


कस सांगू तुला मनात माझ्या काय ?
कळेल कस तुला सांगितल्या शिवाय ?

नजरेला आस तुझी
ओढ हृदयास तुझी
आतुर हे नयन माझे
झलक पाहण्यास तुझी
पाहण्याचा तुला रोज शोधतो मी पर्याय

कस सांगू तुला मनात माझ्या काय ?
कळेल कस तुला सांगितल्या शिवाय ?

दिन रात भास तुझा
मनाला या ध्यास तुझा
हवाहवासा ग वाटे
मला सहवास तुझा
तुझी साथ जीवनात हवी आता ग जगाय

कस सांगू तुला मनात माझ्या काय ?
कळेल कस तुला सांगितल्या शिवाय ?



देईन तुला सुख सारे नाही याची देत हमी
पण प्रेमात नाही राहणार कधी कोणतीही कमी
तुझी साथ नशिबात असो किंवा नसो
पण पाहवेना मला तुझ्या नयनात नमी
तुझ्या खुशीतच माझी ख़ुशी जणू काय

कस सांगू तुला मनात माझ्या काय ?
कळेल कस तुला सांगितल्या शिवाय ?

आयुष्यात माझ्या मला
खुश तुला पहायचय
तुझ्या सोबत जगायचय
तुझ्या सोबत मारायचाय
स्वप्न माझी पूर्ण होण्यास तुझा होकार हवाय

कस सांगू तुला मनात माझ्या काय ?
कळेल कस तुला सांगितल्या शिवाय





3 comments