नववर्षाच्या नव्या कल्पना
घेऊन आले वर्ष नवे
करुया साकार स्वप्न आपुले
आपल्या जे हवे हवे
तरुणाईचे दिवस असती
फुलायचे हसायचे
संगणकाचे घेऊन शिक्षण
स्वप्न आपुले फुलवायचे
महागाईवरती करू मात
नाही नुसते रडायचे
कष्ट करुनी दिवस सजवुया
नाही मागे हटायचे
दीनदुबळ्यांची करुया सेवा
जन्मदात्यांचा ठेवू मान
चुकले असेल मागे काही
नाही आता चुकायचे
आपुले नशीब आपल्या हाती
देह झिजवुया देशासाठी
देशासाठी जन्म आपला
देशासाठीच मरायचे
नागरिक आम्ही नव्या युगाचे
भारतीय संस्कृती आपली शान
श्रद्धा,शांतीची मशाल घेऊन
देऊ सर्वाना जीवनदान
साक्षरतेचे धडे गिरवूया
नाही अडाणी राहायचे
भारत माझी मातृभूमी
मानाने हे सांगायचे
शिक्षणातून फुलते जीवन
सर्वांनाच पटवून द्यायचे
विचार करुनी उचला पाऊल
नाही दबावात जगायचे
friendship
उत्तर द्याहटवा