अरे पावसा पावसा
तुझ्यावर बहू गाणी
तुझ्या तालावरी चाले
दुनियेची आबादानी
अरे पावसा पावसा
तुझ्यामाधी पाणी पाणी
कधी एका थेंबासाठी
गळे डोळ्यांतले पाणी
अरे पावसा पावसा
तुझ्या आरडाओरडा
एक वाफा भिजविशी
दूजा ठेविशी कोरडा !
अरे पावसा पावसा
तुझ्ये गुपित कळेना
वेधशाळेच्या अंदाजा
तुझे गणित जुळेना
अरे पावसा पावसा
तुझा कोण रे मालक ?
पंचभूतांचा जनिता
तोच तुझाही चालक !
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा