बसले होते एकांतात आठवल्या त्या आठवणी
काही पुसटश्या तर काही दिसेनाश्या......
काहींना लागलेला गंज
तर काही अडगळीत पडलेल्या
वर्षानुवर्ष जपलेल्या
पण म्हाताऱ्या झालेल्या.....
काही अलीकडच्याच स्वप्नात झुलत होत्या
स्वताला न्याहाळत आकर्षित करत होत्या
त्यातही काही गोड तर काही कडू होत्या
काही सुखद तर काही दुखद......
जवळ कोणी नसताना
सोबत असल्याचा धीर देतात
फेकल्या कितीही दूर तरी
जीवनाचा आधार बनतात.....
किती विचित्र असतात या आठवणी
पण एकांतात साथ आपली देतात.....
मनात दुख असतानाही
चेहऱ्यावर हास्य आणतात...
Black Flash...
उत्तर द्याहटवाkharach khup tras detat ya aathvani pan ya ch aadhar detat .... ani khup kahi sangun jatat ....
उत्तर द्याहटवाखुपच छान कविता आहेत.
उत्तर द्याहटवाएकदमच सम्पूर्ण आठवणी जाग्या करून देतात.
कृपया मला माझ्या ई मेल वर पाठविल्या तर फारच छान होईल 👌