||सख्याची मैत्रीण||

सख्याची मैत्रीण
घोर हो जीवाला
हिडींबा मजला
भासतसे ||१||

होतो बिझी सखा
बाराच्या नंतर
बोले निरंतर
सटवीशी ||२||

उगाच काहीही
प्रोब्लेम्स सांगते
सख्याला ओढते
स्वतःपाशी ||३||

सखयाला अशी
निरागस वाटे
सांगतो ती खेटे
अजाणते ||४||

घेऊन तिजला
बरिस्तात जातो
मजला टाळतो
भेटायाचे ||५||


भोळा तो भाबडा
माझा रे सजणा
देवा नारायणा
सांभाळ रे ||६||

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा