आठवण तुझी
दाटता मनी,
भरुनी येई
नयन पापणी.......!!
हात तुझा
न माझ्या हाती,
गेली विरुनी
नाजूक नाती........!!
तुझीच स्वप्ने नयनी
पाहती घेऊ आकार,
परि तूच नसता
सांग होती कसे साकार..........!!
असा तू सख्या
भिणलास माझ्यात,
दिसशी तूच तू
पाहता मी आरश्यात........!!
आयुष्याच गणितच
चुकलंय तुजवाचुनी,
उरलायस तसाच
तू वजा होऊनही.........!!
तुझ्या आठवणींचा
करू पाहता विसर,
आयुष्यच भासे
मज धूसर धूसर...........!!
तुझ्या सोबतीची
मनी जडे आस,
मनोमनी अजुनी
तुझेच वास..........!!
सख्या तुझेच भास.......!!
like
उत्तर द्याहटवा