मी अशी .......... तुला हवी तशी !

मी अशी .......... तुला हवी तशी !
मी अशी, मी तशी,
मी तुला हवी तशी,
मी चंचला, मी अबोली,
तुज पाहता, चढ़े गालावर लाली !
मी उड़ते, मी झूलते,
फुलपाखरापरी बागड़ते,
तुझ्या येण्याने मी बावरते !
मी गाते, मी फेर धरते,
हळूच येउन,
तुला छेडूनी जाते !
मी हसरी, मी लाजरी,
मी हळवी, जराशी बावरी,
दुराव्याने तुझ्या मुसमुसते !
मी फूलते,
मी बहरते,
तू स्पर्शिता,
मी लाज लाजुनी,
मिटून जाते !


तू चंचल वारा हो,
मी झुलुक तुझी बनते,
सुन्दर गाणे तू हो,
मी तान तुझी बनते !
क्षितिजावरचा तारा तू,
तारका तुझी मी होते,
पहाटेचे स्वप्न तू,
गुलाबी रंग मी भरते, आणि ........,
स्वप्नप्रिया तुझी होते .......
मी अशी ....... मी तशी,
मी तुला हवी तशी बनते,
तुझ्या स्पंदनी स्थिरावते,
तुझ्यात विरघलुनी जाते !!

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा