तू ये

भळभळत्या जखमेला
दाबुन मी धरले आहे
तू फ़क्त एकदाच ये
थोडेच श्वास उरले आहे ||१||

विवशतेने जातानाही
मागे वळली होती
तुझ्याच नकळत तेव्हा तुझी
आसवे खळली होती ||२||

खात्री आहे मला
तू परत येशील
मी फ़क्त तुझीच आहे
म्हणत घट्ट मिठी मारशील ||३||

तुझ्या त्या मिठी साठी
आज मी जिवंत आहे
एकदाच मागे फिरून ये
श्वास थकले आहे ||४||


तू भेटलीच नाही तर
सरण माझे खचेल
वा-यावरती राख माझी
तुझ्या कुशीत बसेल ||५||

तू नाही आलीस तरी
मी राख होऊन येईल
मी फ़क्त तुझाच होतो
ह्याची खात्री देऊन जाईल ||६||

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा