आयुष्याच्या या वाटेवर
मी माझी वाट शोधतोय,
वाहणारे अश्रु येतात िजथुन
मी तो पाट शोधतोय..
मला व्यापलं आहे जीवनाने
अन,मी माझी जागा शोधतोय,
नात्यांच्या या रेशिम बंधातुन
मी माझा धागा शोधतोय...
मनात जे भरुन आहेत कधीचे
मी त्या श्वासांना शोधतोय,
जगण्याची जे उर्मी देतात
मी त्या ध्यासांना शोधतोय....
खरं सांगायचं तर मी
माझ्या हरवलेल्या स्वप्नांना शोधतोय.......
मुख्यपान मी तो पाट शोधतोय..
मी तो पाट शोधतोय..
by Vinayak
|
posted: १०/११/२००८
|
0
comments
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा