आजोबा (बाबा ) तुम्हाला भेट

६१ वर्षांपूर्वी एक तारा आभाळातून निखळला
अन आमच्या घरात नशिबाने विसावला

काळजी वाहता तो आमच्यावर प्रेमधारानी बरसला
संकटात आमच्या तो स्वत लढला
गरजेत माझ्या तो एकटा धावला
सूखे तुमची दुःख माझे मनी बाळगुन चंदनापरी तो झिज़ला
६१ वर्षांपूर्वी एक तारा आभाळातून निखळला
अन आमच्या घरात नशिबाने विसावला

नशीब थोर तयांचे ज्याना हा परिस स्पर्श अनुभवाला
बघता बघता दुनियेत त्यांच्या कायापलट झाला
भाग्यवंत आनंदी आज आम्ही सारे
तुमच्या अशिर्वादंचा खजिना आम्हाला लाभला
६१ वर्षांपूर्वी एक तारा आभाळातून निखळला
अन आमच्या घरात नशिबाने विसावला

एकच प्रार्थना त्या विधात्याकडे
जे तुम्ही दिले ते तुम्हाला दुपटीने मिळो
आकाशातले दीप रोज तुमच्या साठी उजळो
हे आनंदाचे सोहळे अजुन १०० वर्षे चालो
अन दर वर्षी माझे शिर तुमच्या चरणाशी जूळो
माझ्याकड़े आज देण्या काहीच नाही
पण माझे हे रुणाइत फक्त तुम्हाला भेट मिळो
आता शब्द संपले बघा अश्रु गालावर ओघळला
६१ वर्षांपूर्वी एक तारा आभाळातून निखळला
अन आमच्या घरात नशिबाने विसावला

1 comments