स्वातंत्र्यदिनाच्या नकोत केवळ शाब्दिक शुभेच्छा..

स्वातंत्र्यदिनाच्या नकोत केवळ शाब्दिक शुभेच्छा..!

हवं आहे एक निश्चयी मन, हवी आहे प्रतिज्ञा,

’देश माझा आहे, तो निर्मळ करेन..!

भ्रष्टाचाराबद्दल हतबल होणार नाही,

तो संपविण्याकरीता जीवाची शर्थ करेन.

माझ्या बळकट मुठीचा दुर्जनांना धाक राहील.

माझ्या सदाचाराचा दुर्जनांना धाक राहील”

या तुम्ही निश्चयी मनाने, कणखर शरीराने,

या तिरंगी झेंड्याखाली, देशप्रेमाची धगधगती भावना घेऊन,

आपण करुया जयजयकार, आपल्या प्रियतम देशाचा ।

आणि करू या स्वातंत्र्यदिन साजरा.

जय हिंद..जय हिंद...जय हिंद..!

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा