चिरतारुण्य........

-------------------

रंगीत तिचे श्वास आहेत..
वागण्यात आहे तोरा..
नयन उडते बदाम पक्षी..
कुंतल जणू जल-धारा.

दुधिया-गुलाबी लावण्य..
कांती नक्षत्रांचि साय.
ओठात आहे मदिरा..
बघताच होते..हाय!

श्वास माझा थबकुन जातो..
जेंव्हा झोके घेत येते..
काळजाचं होतं कारंजं..
जेंव्हा खळाळून हसते.

एकच प्रश्न तिला पाहून..
नेहमी येतो मनात..
नव्वदीत जर अशी आहे..
कशी असेल सोळाव्यात?

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा