हर दिल काही व्यथा सांगते
त्याची कविता ऐकत जा
हर मन काही स्वप्न पहाते
त्याचे गाणे गुंफ़त जा
रस्त्याने कुजबुजत चालली
पौगंडातिल मुले फ़ुले
त्यांच्या शंका जिज्ञासांना
शब्दांतुन तू मांडत जा
घराघरातिल व्यथा सारख्या
चर्चा जगभर होने दो
जगभरच्या चर्चांचे मुद्दे
घराघरातुन सांडत जा
बुलंद स्वप्ने नवतरुणांना
धडपडणार्यां खांदा दे
धडधडणार्या हृदयांवरती
गुलाब पाणी शिंपत जा
कविता म्हणजे नसे खेळणे
वेळ दवडण्याचे फ़ुकटे
झरझर झरताना जे झुरते
काळिज ते सांभाळत जा
चिरतरुणांचा सुगंध बन तू
पिचलेल्यांचा अश्रू बन
दबलेल्यांचा झेंडा बन
रस्त्यारस्त्याने फ़डकत जा
कुबट कोपरा धरून खोकत्या
वृद्धांची काठी बन तू
बागेमध्ये बागडणार्या
कळ्यांसवेही खेळत जा
रानांतून जा हिरव्या हिरव्या
श्वास मोकळा घे तू खरा
धूर ओकत्या चिमण्यांवर तू
नोटीस बनुनी चिकटत जा
अशी नको तू, तशी नको तू
कोणी दिला अधिकार मला ?
कोणाच्याही बापाला तू
नकॊ घाबरू (!) बोलत जा
मुख्यपान ۞ बये ! कविते !
۞ बये ! कविते !
by Vinayak
|
posted: १०/०९/२००८
|
0
comments
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा