अंधार फार झाला
by Vinayak
|
posted: ४/२७/२०१५
|
24
comments
थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला
पणती जपून ठेवा अंधार फार झाला
आले चहु दिशांनी तुफान विस्मृतीचे
नाती जपून ठेवा अंधार फार झाला
काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून
घरटी जपून ठेवा अंधार फार झाला
हे गोठतील श्वास शिशिरातल्या हिमात
ह्रदये जपून ठेवा अंधार फार झाला
वणव्यात वास्तवाच्या होईल राख त्यांची
स्वप्ने जपून ठेवा अंधार फार झाला
हे वाटतील परके आपुलेच श्वास आता
हातात हात ठेवा अंधार फार झाला
शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे
हरणे जपून ठेवा अंधार फार झाला
पणती जपून ठेवा अंधार फार झाला
आले चहु दिशांनी तुफान विस्मृतीचे
नाती जपून ठेवा अंधार फार झाला
काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून
घरटी जपून ठेवा अंधार फार झाला
हे गोठतील श्वास शिशिरातल्या हिमात
ह्रदये जपून ठेवा अंधार फार झाला
वणव्यात वास्तवाच्या होईल राख त्यांची
स्वप्ने जपून ठेवा अंधार फार झाला
हे वाटतील परके आपुलेच श्वास आता
हातात हात ठेवा अंधार फार झाला
शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे
हरणे जपून ठेवा अंधार फार झाला
तू गेली तेव्हा
by Vinayak
|
posted: १०/०८/२०१२
|
7
comments
तू गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
श्वासाच्या अधरावरती
मन झोका घेत होता
तू गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
प्रेमाच्या त्या विरहात
मन हेलकावत होता
तू गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
अंधाराच्या त्या झगमग तारा
झुळूक घालती मृगजळ वारा
तू गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
आकाशाच्या मृदगंध सारा
झुळझुळ वाहे ओढा ओला
हात तुझा हाती होता
by Vinayak
|
posted: ८/०२/२०१२
|
3
comments
हात तुझा हाती होता..
काहीच फरक नाही पडला..
मृत्यु उभा माझ्या दारी होता..
बस..हात तुझा हाती होता..
प्रत्येक श्वास तुझ्या मिठीतला..
... माझ्यासाठी खास होता..
बस.. हात तुझा हाती होता..
डोळ्यांतुन ओघळलेला थेंब
माझ्यावरच्या प्रेमाची साक्ष होता
बस..हात तुझा हाती होता..
तो रुसलेला ओला रुमाल..
पाऊले मागे फिरताना हसला होता
बस..हात तुझा हाती होता..
क्षणांत वाढणारे अंतर पण..
श्वासांत तुझाच दर्प होता
बस..हात तुझा हाती होता..
प्रेम हे असच असत
by Vinayak
|
posted: ७/३१/२०१२
|
8
comments
प्रेम हे असच असत....
करताना ते कळत नसत आणि
केल्यावर ते उमगत नसत...
उमगल तरी समजत... नसत पण
आपल वेड मन आपलच ऐकत नसत...
प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते
ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते.
लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात...?
प्रेम हे सांगून होत नसत...
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..
दोन जीवांना जोडणारा तो
एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना
ऐकवणारा एक भाव असतो...
प्रेमाचा अर्थ
by Vinayak
|
posted: ७/२९/२०१२
|
14
comments
सकाळी डोळे उघडण्या पूर्वी जिचा
चेहरा पाहण्याची इच्छा होते ....ते प्रेम आहे
मंदिरा मध्ये दर्शन करताना जी
जवळ असल्याचा भास होतो ...ते प्रेम आहे
भांडून सुधा जिचा राग येत नाही.. ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण
दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते... ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन
मोकळे झाल्यासारखे वाटते...ते प्रेम आहे
स्वताला कितीही त्रास झाला तरीही
जिच्यासाठी ख़ुशी मागता .....ते प्रेम आहे
जिला लाख विसरण्याचा प्रयत्न
करा विसरता येत नाही.... ते प्रेम आहे
कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत
जिचा फोटो असावा असे आपल्याला वाटते..
प्रेम काय असत?
by Vinayak
|
posted: ७/२६/२०१२
|
8
comments
एका मुलीने ने देवाला
विचारलं प्रेम काय असत?
देव म्हणाला बागेतून एक फुल घेवून ये.
ती मुलगी फूल आणायला गेली ,
तिला एक फूल आवडल,
पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत ,
ती पुढे चालली गेली ,
पण तिला चांगल फूल नाही मिळाल ,
जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली ,
तेव्हा ते फूल तिथे नव्हत ,
तिला खूप पश्चाताप झाला ,
तिने देवाला येऊन सांगितलं , तेव्हा देव म्हणाला ,
"हेच आहे प्रेम"
जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत .
तेव्हा त्याची कदर नाही करत ,
पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते.....
जीवनात नाती
by Vinayak
|
posted: ७/२४/२०१२
|
3
comments
जीवनात नाती तशी
अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक
फार कमीच असतात......|
काही नाती असतात रक्ताची,
तर काही हृदयाची......|
काही नाती असतात जन्मो-जन्मीची,
तर काही.. ' काही क्षणापुरतीची '.......|
काही नाती असतात,
केसांसारखी न तुटणारी,
पण वेळ आलीच तर वाकणारी.....|
काही नाती असतात,
लांबुनच आपले म्हनणारी,
जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....|
काही नाती असतात,
पैशाने विकत घेता येणारी,
तर काही प्रेमाने आपलेसे करणारी......|
शब्दा वाचून तिला सगळ काही कळते
by Vinayak
|
posted: ७/२२/२०१२
|
2
comments
ती: खूप दिवसा पासून काही तरी
विचारायचं होता... विचारू का?
तो: permission काय घेतेस...
विचार जे विचारायच्या ते...
ती: तू रोज कविता का करतोस?
तो: मनातल सगळ सांगण्यासाठी...
ती: मग कवितेत का रडतोस?
तो: माझ एकटे पण विसरण्यासाठी...
ती: कशी सुचते रे कविता तुला ?
कसे सुचतात रे शब्द ?
भिडते रे मनाला कविता तूझी,
अन वाचून होते, मी रे स्तब्ध...
तो: कशी सुचते ते मला माहित नाही,
पण लिहितो मी काही तरी...
शब्द नसतात ग त्यात,
रचत मी भावनांची रांगोळी ...
प्रेमात पडलं की असच व्हायचं !!
by रविंद्र कालाणे
|
posted: ६/१२/२०१२
|
0
comments
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिचं बोलणं, तिचं हसणं
जवळपास नसूनही जवळ असणं;
जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं;
अचानक स्वप्नात दिसणं !
खटयाळ पावसात चिंब न्हायचं !
माझं काय, तुमचं काय
प्रेमात पडलं की असच व्हायचं !!
केसांची बट तिने हळूच मागं सारली ...
डावा हात होता की उजवा हात होता?
आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण,
मनात आपल्या साठवतो
ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?
आपण सारखं आठवतो,
प्रेमात पडलास का ?
by Vinayak
|
posted: ५/२५/२०१२
|
0
comments
कसे सांगू तिला
जेव्हापासून पाहिलंय तुला
चैन नाही एक क्षण मला
ती वेडी विचारते मला
काय रे नाव संग न ?
कसे सांगू तिला
त्तुझेच नाव सांगायचं मला
ती वेडी विचारते मला
खूप आवडते का रे ती तुला?
कसे सांगू तीला
तीच हवी आहे आयुष्याचा जोडीला
म्हणूनच रोज हेच मागणे मागतो देवाला
ती वेडी विचारते मला
का रे मग सांगणार कधी तू तिला....?
मैत्री केली आहेस म्हणुन...
by रविंद्र कालाणे
|
posted: ३/३०/२०१२
|
1 comments
मैत्री केली आहेस
म्हणुन तुला सांगावसं वाटतंय...
गरज म्हणुन नातं कधी जोडू नकोस...
सोय म्हणुन सहज असं तोडू नकोस...
रक्ताचं नाही म्हणुन कवडीमोल ठरवु नकोस...
भावनांचं मोल जाण, मोठेपणात हरवु नकोस...
विश्वासाचे चार शब्द, दुसरे काही देऊ नकोस...
जाणीवपुर्वक नातं जप, मधेच माघार घेऊ नकोस...
गुढीपाडवा
by रविंद्र कालाणे
|
posted: ३/२३/२०१२
|
1 comments
आनंदाची उधळण करीत
चैत्र पंचमी दारी आली...
नव्या ऋतुत नव्या जीवनात
उत्साहाची पालवी फुलली...
कडूनिंब दुःख निवारी
साखर सुख घेऊन येई...
पानाफुलांचे तोरण बांधुन दारी...
इच्छा आकांक्षांची गुढी
उभारुया आपल्या दारी...
कुणीतरी आपल्यासाठी.....
by रविंद्र कालाणे
|
posted: ३/१६/२०१२
|
1 comments
का कुणास ठाऊक प्रत्येकाला वाटते
कुणीतरी आपल्यासाठी असावे
ज्याच्यावर आपण थोडेफार रुसावे
आपल्या डोळ्यातील अश्रु एकदा तरी त्यानेच पुसावे
रागवता आपण, त्याने आपल्याला समजवावे
मनातील व्यथांना त्याच्याच जवळ मोकळे करावे
उशिर झाला केव्हा तर लटके लटके रुसावे
पण वाट पहात आपली त्याने तिथेच असावे
केव्हा नटता सावरता आपण
त्याने मनापासुन कौतुक करावे
का कुणास ठाऊक प्रत्येकालाच वाटते..
कुणीतरी आपल्यासाठी असावे...
कुणीतरी असेल तर
by Vinayak
|
posted: ३/१३/२०१२
|
1 comments
डोळे पुसायला कुणीतरी असेल तर,
रुसायला बरं वाटतं.
ऐकणारे कुणीतरी असेल तर,
मनातलं बोलायला बरं वाटतं.
कौतुक करणार कुणीतरी असेल तर,
थकेपर्यत राबायला बर वाटतं,
नजर काढणारं कुणीतरी असेल तर,
नटायला बरं वाटतं.
जिवाला जिव देणारे वाटसरु असतील तर,
मरेपर्यत चालायला बर वाटतं...
रुसायला बरं वाटतं.
ऐकणारे कुणीतरी असेल तर,
मनातलं बोलायला बरं वाटतं.
कौतुक करणार कुणीतरी असेल तर,
थकेपर्यत राबायला बर वाटतं,
नजर काढणारं कुणीतरी असेल तर,
नटायला बरं वाटतं.
जिवाला जिव देणारे वाटसरु असतील तर,
मरेपर्यत चालायला बर वाटतं...
तू नक्की हो म्हणशील !!
by Vinayak
|
posted: ३/१०/२०१२
|
2
comments
तुलाच माहित नाही तुझ्या हसण्यात जादू आहे ,
वेडं करेल एखाद्याला त्यात इतकी ताकत आहे
तुझा ते सौंदर्य नझर खीळणारं आहे ,
तुझ्या प्रेमात न पडणे खरच अशक्य आहे ?
मनी आणि स्वप्नी तुझेच चित्र रेखाटतो ,
गुलाबाच्या फुलाहून तुझा सहवास सुंदर वाटतो
चित्त माझं उडायला तूच कारणीभूत आहेस ,
तुझी चूक नाही कारण हे होणं साहजिक आहे
तुझा चेहरा काही करून नजरे आड जात नाही ,
रात्री झोपू आणि दिवसा चैन देत नाही
तुला माहित नाही पण हे तुझ्यावरचा प्रेम आहे ,
कारण तुला हे समजणं खूप कठीण आहे
गुलाबी कागदावर लिहू का रक्ताने उमटवून देऊ ,
प्रेम करतो तुझ्यावर हे कसे तुला सांगू ?
मला नाही म्हण्याला तुला एक सेकंद लागेल ,
पण मला त्यातून सावरायला हा जन्म कमी पडेल
देहाचे अत्तर
by Vinayak
|
posted: ३/०८/२०१२
|
0
comments
शेत झाले मळा
मळा त्याचे घर
राब राब राबे
'बा'चे दोन कर
काळा निळा होय
मायेचा पदर
चुलीचा निखारा
घेत अंगावर
जावे रोज शाळा
दोघांचा जागर
नाही मिळे खाया
कुणाबी भाकर
संस्कार हे असे
त्याचे आम्हांवर
म्हणे 'पाय गट्ट
रोवा मातीवर'
समर्पण
by Vinayak
|
posted: ३/०७/२०१२
|
0
comments
बिंबणं तुझं माझ्यावर
माझ्यामधल्या मनावर
माझं मन भटकताना
तुझ्यातल्या त्या
आठवणींवर ...
जाणीव तुझी माझ्यावर
माझ्यामधल्या भवनावर
माझा मीच भरकटताना
तुझ्यातल्या त्या आशेवर
कोंदण तुझं माझ्यावर
माझा क्ष्वास येता जाता
तुझ्यातल्या त्या
हास्यावर ...
शब्द तुझा माझ्यावर
माझ्यामधल्या विश्वासावर
विश्व माझं तुझ्यासाठी
तुझ्या एका शब्दावर ...
कवी:लोंकिक प्रभुणे
कुणीतरी आपल्यासाठी असावे
by Vinayak
|
posted: ३/०६/२०१२
|
0
comments
का कुणास ठाऊक प्रत्येकाला वाटते
कुणीतरी आपल्यासाठी असावे
ज्याच्यावर आपण थोडेफार रुसावे
आपल्या डोळ्यातील अश्रु एकदा तरी त्यानेच पुसावे
रागवता आपण, त्याने आपल्याला समजवावे
मनातील व्यथांना त्याच्याच जवळ मोकळे करावे
उशिर झाला केव्हा तर लटके लटके रुसावे
पण वाट पहात आपली त्याने तिथेच असावे
केव्हा नटता सावरता आपण
त्याने मनापासुन कौतुक करावे
का कुणास ठाऊक प्रत्येकालाच वाटते..
कुणीतरी आपल्यासाठी असावे......
त्याने मनापासुन कौतुक करावे
का कुणास ठाऊक प्रत्येकालाच वाटते..
कुणीतरी आपल्यासाठी असावे......
कवी:नागेश पाटील
कवडसा
by Vinayak
|
posted: ३/०५/२०१२
|
0
comments
एक कवडसा स्नेहाचा
तुझ्या नाझ्या नात्याचा
एक कवडसा धीराचा
अंतर्मनातील हाकेचा
एक कवडसा मैत्रीचा
तुझ्या माझ्या निरागसतेचा
एक कवडसा विश्वासाचा
सर्व वचणे पाळण्याचा
एक कवडसा भावनेचा
तुझ्या माझ्या रेशीमगाठीचा
एक कवडसा मदतीचा
न बोलावता येण्याचा
एक कवडसा विचाराचा
तुझ्या माझ्या समजुतदारपणाचा
एक कवडसा चांदण्याचा
मनी प्रीत फुलण्याचा
मराठी भाषा दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
by Vinayak
|
posted: २/२७/२०१२
|
1 comments
नवीन अभिप्राय