कवडसा

एक कवडसा स्नेहाचा
तुझ्या नाझ्या नात्याचा
एक कवडसा धीराचा
अंतर्मनातील हाकेचा

एक कवडसा मैत्रीचा
तुझ्या माझ्या निरागसतेचा
एक कवडसा विश्वासाचा
सर्व वचणे पाळण्याचा

एक कवडसा भावनेचा
तुझ्या माझ्या रेशीमगाठीचा
एक कवडसा मदतीचा
न बोलावता येण्याचा

एक कवडसा विचाराचा
तुझ्या माझ्या समजुतदारपणाचा
एक कवडसा चांदण्याचा
मनी प्रीत फुलण्याचा


एक कवडसा स्वप्नांचा
तुझ्या माझ्या भविष्याचा
एक कवडसा अभिलाषेचा
विरहात पूर्ण जळण्याचा

एक कवडसा वेदनेचा
तुझ्या माझ्या अंताचा

कवी: सुधाकर कुलकर्णी,नाशिक

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा