चांदण्या रात्रीतील भटकंती

अधिकच दुधाळ आहेत आज,चंद्र आणि तारे..
बागडताहेत ते परिचित घुबड आणि वटवाघळे..
आज काहीतरी घडलय हे नक्की..
का अधिकच गहिरा होतोय आज अंधार..
वाजतेय आज मनाची सतार..
कारण आज सोबतीला तु आलाहेस ना..
जसा काळोखाच्या सोबतीला येतो चंद्रमा..
एकत्रच पडताहेत दोघांची पाऊले..
एकाच लयीत आहेत..
तुझ्या अन माझ्या ह्रदयाची स्पंदने..
रोजचाच हा काळोखाने व्यापलेला रस्ता..
आज,काजव्यांच्या रोषणाईने उजळलेला..
बोलुन सारे विषय संपलेले..
तरी तुझे आणि माझे बोलणे चाललेले..
कधी डोळ्यांनी,कधी शब्दांनी सजलेले..
रात्रीचा हा बोचरा वारा,हा काळोख तुलाही तेच सांगतोय का रे..
जे तो मला सांगतोय..
उद्या विवाह बंधनात गुंफणारे आपण..
अशीच वाटचाल करुया जीवनभर..
अनोळखी भविष्याच्या अंधारात चालतांना..
पेटवु विश्वासाचे दिवे वाटेवर..



सुक्ष्म काजव्यांप्रमाणे सुखही कदाचित कमी येइल आपल्या वाटेला..
पण,तेवढेही पुरे असतात निराशेचा अंधार भेदायला..
करतील किरकिर हितशत्रु रातकिडे बनुन..
पण,आपण जायचे एकमेकांच्या प्रेमात विरुन..
चल, परतुया आपापल्या घरी,
स्मरणात ठेवुन 'चांदण्या रात्रीतील भटकंती'..
अंधार अधिक उजळ होत आहे..
बघ रे,सुर्य पुढच्या वळणावर उभा आहे..

1 comments