अधूरे स्वप्न

अधूरे स्वप्न

किती स्वप्न पहिली रे
आपण दोघानी

स्वप्न एक घराचे ..छोटेसे घरकुल
आपण दोघानी सजवालेले
आपल्या दोघांच्या प्रेमाने
फुलासारखे बहरलेले

स्वप्नाच्या हिन्दोल्यावर
कसे झुलायाचो न आपण
एकमेंकांच्या सहवासात
सुखावून जायचो न आपण

आता ना ती स्वप्ने राहिली
ना राहिला तो सहवास
राहिले फक्त एकाकीपन
नि उरले फक्त आभास

सगली स्वप्ने विस्कटून गेलीत
हाती काहीच राहिले नाही
डोलयामधूनही ही आता
पाणीच पाणी वाही .....


अधूरी राहिलेली स्वप्ने
खुप जिव्हारी लागतात रे
मनाच्या कप्प्यात खोलवर रुतून
आयुष्यभर सलतात रे

तुला ही हे अधूरे स्वप्न
आयुष्यात कधी सलेल का
कधी तरी पुढे जाता जाता
मागे पाउल वलेल का

वळलास कधी मागे तर
थांब एक क्षण
तुझी वाट पाहत वलनावर थांबलय
माझे ही मन 

3 comments