काही प्रश्न फक्त तुझ्यासाठी

जवळ जरी नसलीस '
सोबत आहेस
शब्दात नसलीस
विचारात आहेस
.....माझा विचार कधी करतेस का?

सावलीने माझ्या बघ
कधी आकार बदलला
आठवणी ने तुझ्या
सावलीसारखा माझा पाठलाग केला
...तुझ्या सावलीला हि मी येणार नाही अस तू म्हणाली होतीस न?

भेटताच अपघाताने
नजर का वळवली?
तुझी ती युक्ती
मला तेव्हांच कळली
...थोड पुढ गेल्यावर तू पर्स मधून रुमाल काढला होतास का?


शरीर माझे बघ किती
गलितगात्र झाले
पाहताच तुला ,मन माझे
किती सूसाट्याने पळाले
...हॉस्पिटल मध्ये माझी चौकशी करायला आली होतीस का?


पिंडाला माझ्या
कावळा शिवलाच नाही
नाव घेतल्याशिवाय तुझ
माझा आत्मा मुक्त झालाच नाही
..पुढच्या जन्मी माझी होशील का?

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा