घर

त्याने विचारलं
तू कुठे राहतेस ?
आणि..
टप्पोरं फुल अवेळी कोमेजावं तसं हासू कोमेजलं
तेजस समईवर काजळी जमावी तसा चेहरा विझला

घर ?
माझं घर ?
मी..कुठे राहते मी ?

कुठला पत्ता सांगू त्याला ?

त्या घराचा ? जे मी कधीकाळी सोडलं होतं ?
आता..जिथे राहणं माझी मजबुरी आहे..

की ,
त्या घराचा ? जिथे मी आसरा घेतला होता ?
जिथे आता जायची इच्छा नाही..

की ,
त्या घराचा ? जे मी ’माझं’ मानलंय ?
जिथे मी कायमची राहू इच्छिते..

त्याचा साधासा प्रश्न पण मला मात्र बेघर करुन गेला..

2 comments