"अनपेक्षित भेट"

आज पुन्हा तुझी-माझी भेट झाली...
माझ्या डायरीची पानं नवी-कोरी झाली....
समोर आलास सारं पुन्हा आठवले...
मिटलेले मनाचे दरवाजे अलगद उघडले...
पहिल्यांदाही अशीच नकळत भेट झाली
निम्मित पावसाचे अन भेटची वेळ वाढली....
अनेकदा भेटलो त्यानंतरही आपण...
मैत्रीने तुझ्या केले मनात घर..
वेडा वेडा व्हायचास बोलतांना माझ्याशी
खुप सारी मस्ती,थट्टाही जराशी..
तुझं सोबत असणं गॄहीतच धरलं मी...
मैत्रीशिवाय तुझ्या,आयुष्याचा विचारच नाही कधी...
पण कधीच नाही जाणल्या मी भावना तुझ्या...
मी तर रमले होते विश्वात माझ्या...
अचानक गेलास निघुन ,बोलला नाहीस काही,
पण सोबत नसणे तुझे सांगुन गेले बरच काही,
काळ चालत रहिला,अशीच वर्ष उलटली...
स्मॄतीनीं तुझ्या नेहमीच माझी साथ दिली...
हरले नाही मी,वाट पाहत राहीले तुझी,
येशील तु परतुन खात्री होती माझी,


आज पुन्हा भेटलो अगदी तसेच अनपेक्षित...
नजरेला नजरा भिडल्या,अन मनं झाली आनंदित...
आज तुझ्या नजरेतले भाव मात्र मी अचुकपणे हेरले..
नकळत माझ्याही त्यात होकाराचे सुर मिसळले..

                     कवी  अमिता डावरे 

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा