मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

आली मकर संक्राती
नांदी नव्या युगाची

चला राहू नका मागे
चला या रे सारे आगे
संक्रमण करु या
मकराचा सूर्य सांगे

चला झटका जुन्याला
चला कवळा नव्याला
बदलत्या युगासंगे
करा Remix सारे

चला उडवा पतंग
चला उठवा तरंग
दोर हिंमतीचा
उंच जाऊ द्या रे

चला सोडा भांडण तंटे
चला फोडा द्वेषाचे भांडे
गोड तिळगुळ घ्या
बोला बोल प्रेमाचे

घ्या,गोड तिळगुळ घ्या
बोला बोल प्रेमाचे

3 comments:

टिप्पणी पोस्ट करा