गुरुवार 28 जुलै 2011

कोसळणार्‍या त्या चिंब पावसात

रात्र बरीच झाली होती
पौसही कोसळत होता
झालो क्षणातच एकरूप आम्ही
कोसळणार्‍या त्या चिंब पावसात...

खुप समजावले मी तिला
नको भिजुस या क्षणाला
ऐकायचेच नव्हते तिला
कोसळणार्‍या त्या चिंब पावसात...

 राहिलो एकटा आडोशाला उभा
पण पाहत होतो मी फ़क्त तिलाच
भर पडत होती तिच्या सौंदर्यात
कोसळणार्‍या त्या चिंब पावसात...

अशाच साठवून ठेवीन तुझ्या आठवणी
मी माझ्या स्वप्नांच्या डायरीत
तू आणि मी एकत्र असताना
कोसळणार्‍या त्या चिंब पावसात...

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

Thank u. N help us to make our community big by inviting yours friends