होळी रे होळी

मिळू द्या उत्सहाची सात
होऊ द्या रंगांची बरसात
होळी आली नटून सवरून
करू तीचे स्वागत जोश्यात

भरू पिचाकरीत रंग
बेभान करेल ती भांग
जो तो भिजण्यात दंग
रंगू दे प्रेमाची ही जंग

मिळू द्या उत्सहाची सात
घेऊ हातात आपण हात

रंगाच्या ह्या त्यव्हारात
अखंड बुडू या रंगात
बघा आली ती टोळी
घेऊन रंगांची ती पिचकारी

मारा फुगे , उधळा रंग
होऊ या आपण ही दंग
हसत खेळत अशीच साजरी करू
परंपरा आपली ही मराठ मोळी


म्हणा एका जोश्यात एकदा
होळी रे होळी , आली स्पंदनची टोळी
वाचणा~याच्या तोंडात पुरणाची पोळी

2 comments

  1. वाचणार्याच्या हे बरोबर वाटत नाही वाचणा~याच्या असे लेहिता येइल,त्यासाठी १ ह्या आकड्याच्या आधी असलेल्या की चा शिफ़्टदाबोन उपयोग करावा

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. चला रे चला, आली होळी
      परंपरा ही मराठ-मोळी
      गोळा होऊन होलिकोत्सव
      करु साजरा सण पेटवू होळी

      होलिका माता छान नेसवा
      पाचोळा, गोवऱ्यांनी सजवा
      नवयुग होळीचा संदेश नवा
      झाडे लावा व झाडे जगवा

      अग्निदेवतां करूनी पुजा
      द्या टाकून त्यात मनाचा गुंता
      करु होमहवन सर्व दु:खांचा
      विसरु साऱ्या अडचणी चिंता

      नैवद्य पुरणपोळी, देऊ हाळि
      होळी रे होळी, पुरणाची पोळी
      नैराश्याची बांधूनी मोळी
      करु आनंदें साजरी होळी

      घेऊन रंगांची पिचकारी
      बघा बुवा ती आली टोळी
      खालची आळी वरची आळी
      रंगपंचमी खेळू भाबडी-भोळी

      उधळूनी सारे सप्तरंग
      बेभान करी मदमस्त भांग
      रंगून नाचून होऊन झिंग
      जो तो होई भिजण्यात दंग

      मिळू द्या एकमेकांची साथ
      खेळू करु रंगाची बरसात
      होळी आली नटून सवरून
      करू तीचे स्वागत जोश्यात

      ✍🏻प्रकाश सखाराम केळकर

      हटवा