वाहत्या या वाऱ्याला,,,,
कधीच थांबवायचं नसतं....
मनातील दुखांना मात्र,,,
नेहमीच आवरायचं असतं....
समुद्राच्या लाटांना,,,,
कधीच अडवायचं नसतं....
नयनांच्या आसवांना मात्र,,,
पापण्यातच थांबवायचं असतं.....
फुलाच्या गंधाला कधीच,,,
दरवळल्यावाचून ठेवायचं नसतं.....
तुझ्या आठवणींच्या गंधाला मात्र,,,
मनातच जखडायच असतं......
इंद्र-धनुच्या रंगांना,,,,
इकडे-तिकडे पसरवायच नसतं....
आयुष्यातील प्रत्येक रंग,,,,
जरी बिखरलेलं असतं..........
पक्ष्यांच्या मंजुळ स्वरांना,,,
गप्प करायचं नसतं.....
मनातील इच्छांना मात्र,,,
ऐकून सोडायचं असतं.....
पंखांच्या भरारीला,,,,
कधीच कापायचं नसतं....
आपल्या मिलनाच्या स्वप्नाला मात्र,,,,
डोळ्यातच दाबायचं असतं....
का वेडं मन असं,,,,
इच्छा बाळगत असतं......
तू येणार नाहीस हे जसं,,,,,
त्याला ठाऊकच नसतं..............
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा