वाट

तू नाहीस तरी आठवणी तुझ्या आहेत अजुनही
फूल केव्हाच सुकून गेलय.....
परंतु गंध ओला आहे अजुनही
वादळ कधीच शांत झालय.....
तरी वारा वाहतो आहे अजुनही
वाट बदलली मी तरी.....
पाउलखुणा दिसतात तुझ्या अजुनही
रानातून एकटे फिरताना.....
साथीला आवाज
रंग सारे संपले माझे तरी.....
अधूरे आहे चित्र अजुनही
दिलास तू आकार मजला.....
निर्विकार मी अजुनही
फोटो तुझा पाहूनहीं.....
काहूरमनी उठते अजुनही
तू परतणार नाहीस हे माहित असुनही.....
वाट तुझी पहाते मी अजुनही
वाट तुझी पहाते मी अजुनही ......!!

3 comments